पालघर : सुरत ( Surat ) मधील जेट इंडिया इन्स्टिट्यूटतर्फे ( Jet India Institute ) तलासरी आणि डहाणू येथे विद्यार्थी आणि पालकांसाठी एव्हिएशन आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील ( Aviation and hospitality sectors ) करिअर संधींबाबत मार्गदर्शन करणाऱ्या विशेष सेमिनारचे ( Seminars ) आयोजन करण्यात आले होते.
या सेमिनार मध्ये एव्हिएशन क्षेत्रातील अनुभवी तज्ज्ञ निलोफर झुबैर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांना या क्षेत्रातील १५ वर्षांहून अधिक अनुभव असून, एव्हिएशन, हॉस्पिटॅलिटी, ट्रॅव्हल आणि टुरिझम उद्योगातील वाढत्या रोजगाराच्या संधींबाबत त्यांनी सविस्तर माहिती देण्यात आली.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासह देशभरातील विविध विमानतळांच्या विस्तारामुळे निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या संधी, उद्योगक्षेत्रातील आवश्यक कौशल्ये, व्यक्तिमत्त्व विकासाचे महत्त्व आणि व्यावसायिक प्रशिक्षणाच्या उपलब्ध संधी याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरलेल्या मोफत अॅप्टिट्यूड असेसमेंट टेस्टद्वारे विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमता आणि आवडींचे मूल्यमापन करता आले. तसेच स्वतःसाठी योग्य करिअर क्षेत्र निवडण्यास आणि एव्हिएशन, हॉस्पिटॅलिटी उद्योगातील विविध संधींसाठी आपली पात्रता जाणून घेण्यास मदत झाली.
















