पालघर : पालघर जिल्ह्यातल्या ( Palghar district ) डहाणू शहरात ( Dahanu ) भरदिवसा एका ज्वेलर्स दुकानावर सशस्त्र दरोडा टाकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. इराणी रोड परिसरात तिघा अज्ञात दरोडेखोरांनी सिनेस्टाईल पद्धतीने गोळीबार करत दरोडा ( Robbery ) टाकला आणि घटनास्थळावरून फरार झाले. या घटनेमुळे संपूर्ण शहरात भीतीचं वातावरण पसरलं असून पोलीस आरोपींच्या शोधात आहेत.
पहा व्हिडीओ ….
पालघर जिल्ह्यातल्या डहाणू शहरात सोमवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास धाडसी दरोड्याची घटना घडली. डहाणूच्या गजबजलेल्या इराणी रोडवरील ( Irani Road ) ‘लक्ष्मी ज्वेलर्स’ ( Laxmi Jewellers ) या दुकानात मोटारसायकल वरून आलेल्या तिघा अज्ञात दरोडेखोरांनी प्रवेश केला. दरोडेखोरांनी दुकानातील कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवत दुकानातील दागिने आणि रोख रक्कम लुटण्याचा प्रयत्न केला. यावेळी परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी आरोपींनी गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे. गोळीबाराचा आवाज ऐकताच परिसरात एकच खळबळ उडाली आणि नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली.
घटनेनंतर तिन्ही आरोपी मोटारसायकलवरून भरधाव वेगाने पसार झाले. घटनेची माहिती मिळताच दहाणू पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. संपूर्ण परिसराची नाकाबंदी करण्यात आली असून सीसीटीव्ही फुटेजच्या ( CCTV footage ) आधारे आरोपींचा शोध सुरू आहे. या धाडसी घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून शहरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.















