पालघर : पालघर जिल्ह्यात ( Palghar district ) प्रस्तावित वाढवण बंदराला ( Vadhvan Port ) जोडणाऱ्या ग्रीनफिल्ड महामार्गाविरोधात ( Greenfield Highway ) स्थानिक नागरिक आक्रमक झाले आहेत. डहाणू–चिंचणी–बोईसर किनारी मार्गावर वरोर परिसरात नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन ( ‘Rasta Roko’ protest ) करत वाहतूक रोखून धरली आहे. प्रशासनाकडून महामार्गासाठी जमीन ताब्यात घेण्याची प्रक्रिया ( Land Acquisition ) सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर हा तीव्र विरोध पाहायला मिळत आहे. घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
पहा व्हिडीओ ….
प्रस्तावित वाढवण बंदराला जोडणाऱ्या ग्रीनफिल्ड महामार्गासाठी जमीन संपादनाची प्रक्रिया सुरू असताना स्थानिक नागरिकांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. डहाणू–चिंचणी–बोईसर कोस्टल मार्गावरील वरोर इथे शेकडो ग्रामस्थ रस्त्यावर उतरले असून, तब्बल चार तासांहून अधिक काळ रास्ता रोको आंदोलन सुरू आहे. महामार्गामुळे शेती, घरे आणि उपजीविकेवर परिणाम होणार असल्याचा आरोप करत स्थानिकांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनामुळे या मार्गावरील वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. दरम्यान, परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आंदोलन अधिक चिघळू नये यासाठी पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.
















