जमिनीच्या वादातून सख्या भावानेच केली भावाची केली फिल्मी स्टाईल हत्या
पालघर : पालघर जिल्ह्यातल्या अशोक धोडी अपहरण आणि हत्ये प्रकरणात 5 महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपी अविनाश धोडी ला पालघर पोलिसांनी आज सकाळी सिलवासा येथील मोरखल इथून अटक केली आहे. या हत्या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत 5 आरोपींना अटक केली असून इतर फरार असलेल्या 3 आरोपींचा शोध अजून सुरू आहे. आरोपीला आज पालघरच्या न्ययालयात हजर केलं असता न्यायालयाने त्याला १४ जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पहा व्हिडीओ :
आपापसात असलेल्या जमिनीच्या वादातून सख्या भावानेच आपल्या भावाची अगदी फिल्मी स्टाईल ने हत्या केल्याची घटना पालघर जिल्ह्यातून समोर आली आहे. पालघर जिल्ह्यातल्या तलासरी मधल्या वेवजी काटीलपाडा इथे राहणारे 52 वर्षीय मयत अशोक धोडी आणि आरोपी अविनाश धोडी या दोन्ही भावांमध्ये जमिनी संदर्भात काही वाद सुरू होते. दरम्यान याचा राग मनात ठेवून आरोपी अविनाश धोडी याने 19 जानेवारी ला संध्याकाळच्या वेळी अशोक धोडी घरी जात असताना वेवजी घाटातील हिलझील डोंगराच्या वळणावर आपल्या काही साथीदारांसह अशोक यांची गाडी अडवून गाडीसह त्याचं अपहरण केलं. आणि त्यानंतर अशोक धोडी यांची त्यांच्या आरोपी भावाने हत्या केली. हे सर्व केल्यावर प्रश्न होता पुरावे नष्ट करण्याचा. खुनाचे सर्व पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपी भावाने अगदी फिल्मी स्टाईल वापरली. आरोपीने अशोक धोडी यांचा मृतदेह त्यांच्याच कार मध्ये ठेवून त्यांची कार गुजरात राज्यातील सारीगम वाडियापाडा येथील पाण्याने भरलेल्या खदानीत फेकून दिली. आणि त्यानंतर आरोपी अविनाश धोडी आणि त्याचे 3 साथीदार तिथून फरार झाले.
घटनेनंतर पालघर स्थानिक गुन्हे शाखेच्या नेतृत्वाखाली एक विशेष टीम तयार करण्यात आली. या टीमने घोलवड, उमरगावं, वापी, दिव दमण, सिलवासा, इंदौर, राजस्थान या ठिकाणी आरोपींचा शोध घेणं सुरू केलं. आणि आज पोलिसांनी या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी अविनाश धोडी याला गुजरात राज्यातील सिलवासा येथील मोरखल येथून अटक केली.
या हत्या प्रकरणात काही पोलिसांची भूमिका संशयास्पद दिसून आल्याने आता पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर ही कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे. त्यात एक पीएसआय यांना सस्पेंड, 8 पोलिस अंमलदारांना कारणे दाखवा नोटीस, आणि संबंधित पोलिस स्टेशन चे प्रभारी यांची बदली अश्या प्रकारची कारवाई करण्यात आल्याची माहिती पालघरचे पोलिस अधीक्षक यतीश देशमुख यांनी दिली आहे.