मोठा अनर्थ टळला, चालक जखमी
पालघर : पालघरचे खासदार डॉ. हेमंत विष्णु सवरा यांच्या कारचा घोडबंदर रोडवर अपघात झाला असून सुदैवाने ते बचावले आहेत. मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील घोडबंदर रोड येथे रॉंग साइडने आलेल्या डंपरने त्यांच्या इनोव्हा कारला जोरदार धडक दिली.
या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले असले तरी, वेळेवर एअरबॅग उघडल्यामुळे मोठा अनर्थ टळला. खासदार सवरा यांना कोणतीही दुखापत झाली नाही. मात्र चालकाचा हात फ्रॅक्चर झाला असून त्याला तातडीने Jupiter Hospital येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

खासदार डॉ. सवरा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते एका विवाह समारंभासाठी ठाणे येथे गेले होते आणि रात्री तेथेच मुक्काम केला होता. आज सकाळी महाराष्ट्र दिनानिमित्त पालघर येथे ध्वजारोहण कार्यक्रमासाठी जात असताना हा अपघात घडला.
















