पालघर : डिजिटल मिडिया संपादक आणि पत्रकार संघटना, महाराष्ट्र यांच्याकडून देण्यात आलेला मानाचा महाराष्ट्र महागौरव पुरस्कार सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण सावे यांना प्राप्त झाला आहे.
महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये विविध क्षेत्रात निस्पृहपणे आणि निस्वार्थीपणे सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्या काही मोजक्या व्यक्तिमत्वांची या संघटनिकडून निवड करण्यात आली. जेडब्ल्यू मॉरिएट, पुणे इथे महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आयुष्मान भारत मिशनचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे यांच्या हस्ते डॉ. किरण सावे यांना महाराष्ट्र महागौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं.