पालघर : कोव्हिड-19 प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात पालघर ग्रामीण भागातल्या तसचं वसई- विरार महानगरपालिका क्षेत्रात आरोग्य कर्मचारी, पहिल्या फळीमध्ये काम करणारे कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक आणि व्याधी असलेल्या व्यक्तीसह 75 हजार 728 जणांना लसीकरणाचा पहिला डोस देण्यात आला आलाय. तर 15 हजार 833 व्यक्तींना दुसरा डोस देण्यात आला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत 91 हजार 561 व्यक्तींना कोव्हिड ची लस देण्यात आली आहे. लसीकरण पुर्णपणे सुरक्षित असून नागरिकांनी लसीकरण करून घ्यावं असं आवाहन जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी केलं आहे. कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लस जिल्ह्यात उपलब्ध आहेत. लसीकरण केंद्राची संख्या 61 असून त्यात पालघर ग्रामीण भागात 32 शासकीय लसीकरण केंद्र तर 5 खाजगी लसीकरण केंद्र आहेत.
तसचं वसई विरार महानगरपालिका क्षेत्रात 14 शासकीय तर 10 खाजगी लसीकरण केंद्र स्थापन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. 1 ते 28 मार्च दरम्यान जिल्ह्यात 3677 नविन कोरोना पॉझीटीव्ह रुग्णांची नोंद झाली असून या कालावधीत 18 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती देखील त्यांनी दिली.