पालघर : पालघर जिल्ह्यातल्या बोईसर मधल्या तारापूर औद्योगिक क्षेत्रातल्या (M.I.D.C) प्लाट नं.N-128 बजाज हेल्थ केअर या केमिकल कंपनीत आज सकाळी साडे आठ वाजताच्या दरम्यान भीषण आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलानं घटनास्थळी पोहचून कामगारांना सुखरूप बाहेर काढलं.
शर्तीच्या प्रयत्नानंतर अग्निशमन दलाला या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. या आगीत कोणत्याही प्रकारच्या जीवितहानीचं वृत्त नाही. मात्र या आगीच कारण अद्याप कळू शकलेलं नाहीये.