पालघर : महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागाद्वारा ( Sports Department, Government of Maharashtra ) जिल्हयातील सर्वोत्कृष्ट क्रीडापटूंना आणि क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या व्यक्तींना क्रीडा विभागाचा प्रतिष्ठेचा “जिल्हा क्रीडा पुरस्कार” ( District Sports Awards ) प्रदान करण्यात येतो.
क्रीडा क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करणा-या क्रीडा मार्गदर्शकांसाठी गुणवंत क्रीडा मार्गदर्शक, गुणवंत क्रीडा पुरस्कार (खेळाडू), गुणवंत क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) असे पुरस्कार प्रदान करण्यात येतात. या पुरस्कारासाठी पालघर जिल्हयातील क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, दिव्यांग खेळाडू / व्यक्ती यांच्याद्वारा ५ ते २० फेब्रुवारी या कालावधीत पालघर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत.
अर्ज सादर करणा-या इच्छूक क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू आणि दिव्यांग खेळाडू यांनी दिलेल्या मुदतीत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत असं आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास व्हनमाने यांनी केले आहे.