पालघर : महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेतर्फे प्रतिवर्षी तत्त्वज्ञान विषयाशी निगडीत ग्रंथासाठी उत्कृष्ठ ग्रंथ पुरस्कार ( Best Book Award ) दिला जातो. या वर्षी या पुरस्कारासाठी पालघर मधल्या सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाचे ( Sonopant Dandekar College ) प्राचार्य डॉ. किरण सावे लिखित अंतरंगी डोकावताना या ग्रंथाची निवड झाली आहे. महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेचे ( Maharashtra Philosophy Council ) ४० वे अधिवेशन हे २६ ते २८ डिसेंबर दरम्यान पुण्यातील सर परशुराम महाविद्यालय ( Sir Parashurambhau College ) संपन्न होणार आहे. या अधिवेशनात “अंतरंगी डोकावताना” या ग्रंथासाठी प्राचार्य डॉ. किरण सावे यांना उत्कृष्ठ ग्रंथ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
प्राचार्य डॉ.किरण सावे यांचा डिंपल प्रकाशन प्रकाशित “अंतरंगी डोकावताना” या ग्रंथाच्या पुस्तक प्रकाशना नंतर केवळ सहा महिन्यात तिसरी आवृत्ती प्रसिद्ध झाली आहे. यावरून या ग्रंथाची लोकप्रियता दिसून येते. अंतरंगी डोकावताना हा ग्रंथ English भाषेमध्ये A JOURNEY INTO THE SOUL या नावाने अनुवादित झाला आहे. प्राचार्य डॉ. किरण सावे यांचे अंतरंगी डोकावताना, A JOURNEY INTO THE SOUL या ग्रंथा व्यतिरिक्त योग तत्त्वज्ञान, “चार्वाक दर्शन प्रासंगीकता काल व आज”, Ancient and Modern Empiricism: Charvaka and Logical Positivism यासारखे मराठी आणि इंग्रजी भाषेत ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत. तसचं प्राचार्य डॉ. किरण सावे यांचे अंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय स्तरावरील परिषदेत 60 पेक्षा अधिक शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत.
प्राचार्य डॉ.किरण सावे यांच्या अंतरंगी डोकावताना या ग्रंथाला उत्कृष्ठ ग्रंथ पुरस्कार मिळाल्याबद्दल सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळीचे अध्यक्ष सी.ए.सचिन कोरे, उपाध्यक्ष धनेशभाई वर्तक, सचिव सुधीर कुलकर्णी, सचिव अनिल पाटील, कोषाध्यक्ष मंगेश पंडित व संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यानी अभिनंदन केलं. तसेच महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डॉ.तानजी पोळ, उपप्राचार्य प्रा.महेश देशमुख आणि महाविद्यालायतील सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर सहकाऱ्यांनी अभिनंदन केलं.