मुंबई : राज्य मंत्रिमंडळांचे खातेवाटप 21 डिसेंबर रोजी जाहीर करण्यात आले आहे. महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर 8 दिवसानंतर अखेर खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सरकारकडून 33 कॅबिनेट आणि 6 राज्यमंत्र्यांचे खाते वाटप जाहीर करण्यात आले. याबाबतची अधिसूचना राज्य शासनाने प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मंत्रीमंडळाचे खाते वाटप पुढील प्रमाणे –
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : गृह, ऊर्जा (अपारंपारिक ऊर्जा वगळून) विधी व न्याय, सामान्य प्रशासन, माहिती व जनसंपर्क, आणि इतर कोणत्याही मंत्र्यांना विवक्षितपणे नेमून न दिलेले विभाग किंवा विषय.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे : नगरविकास, गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम ( सार्वजनिक उपक्रम)
उपमुख्यमंत्री अजित पवार : वित्त व नियोजन, राज्य उत्पादन शुल्क.
कॅबिनेट मंत्री खातेवाटप :
1) चंद्रशेखर बावनकुळे : महसूल
2) राधाकृष्ण विखे–पाटील : जलसंपदा (गोदावरी आणि कृष्णा खोरे विकास महामंडळ)
3) हसन मुश्रीफ : वैद्यकीय शिक्षण
4) चंद्रकांत(दादा)पाटील : उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कार्य
5) गिरीश महाजन : जलसंपदा ( विदर्भ, तापी, कोकण विकास महामंडळ), आपत्ती व्यवस्थापन.
6) गणेश नाईक : वने
7) गुलाबराव पाटील : पाणी पुरवठा व स्वच्छता.
8) दादाजी भुसे: शालेय शिक्षण.
9) संजय राठोड : मृद व जलसंधारण.
10) धनंजय मुंडे : अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण.
11) मंगलप्रभात लोढा : कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता.
12) उदय सामंत : उद्योग, मराठी भाषा
13) जयकुमार रावल : पणन, राजशिष्टाचार.
14) पंकजा मुंडे : पर्यावरण आणि वातावरणीय बदल, पशुसंवर्धन.
15) अतुल सावे : इतर मागास बहूजन कल्याण, दूग्धविकास, अपारंपारिक उर्जा
16) अशोक उईके : आदिवासी विकास.
17) शंभूराज देसाई : पर्यटन, खनिकर्म, माजी सैनिक कल्याण.
18) अॅड.आशिष शेलार : माहिती तंत्रज्ञान, सांस्कृतिक कार्य.
19) दत्तात्रय भरणे : क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास व औकाफ.
20) आदिती तटकरे : महिला व बालविकास.
21) शिवेंद्रसिंह भोसले : सार्वजनिक बांधकाम ( सार्वजनिक उपक्रम वगळून).
22) अॅड.माणिकराव कोकाटे : कृषी.
23) जयकुमार गोरे : ग्रामविकास व पंचायतराज.
24) नरहरी झिरवाळ : अन्न व औषध प्रशासन , विशेष सहाय्य.
25) संजय सावकारे : वस्त्रोद्योग.
26) संजय शिरसाट : सामाजिक न्याय.
27) प्रताप सरनाईक : परिवहन
28) भरत गोगावले : रोजगार हमी योजना, फलोत्पादन, खारभूमी विकास.
29) मकरंद जाधव-(पाटील): मदत व पुनर्वसन.
30) नितेश राणे : मत्स्यव्यवसाय व बंदरे.
31) आकाश फुंडकर : कामगार.
32) बाबासाहेब पाटील : सहकार.
33) प्रकाश आबिटकर : सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण.
राज्यमंत्री खातेवाटप :
1) अॅड. आशिष जयस्वाल : वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार,
2) माधुरी मिसाळ : नगरविकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण, अल्पसंख्याक विकास व औकाफ.
3) डॉ पंकज भोयर : गृह ( ग्रामीण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार, खनिकर्म.
4) मेघना बोर्डीकर : सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा आणि स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम ( सार्वजनिक उपक्रम).
5) इंद्रनील नाईक : उद्योग, सार्वजनिक बांधकाम, उच्च व तंत्रशिक्षण, आदिवासी विकास, पर्यटन, मृद आणि जलसंधारण.
6) योगेश कदम : गृह ( शहरी) महसूल, ग्रामविकास आणि पंचायतराज, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रशासन.