पालघर : अमरावती इथं नुकत्याच पार पडलेल्या शालेय राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत पालघर जिल्ह्यातल्या दोन खेळाडूंनी रौप्य पदक मिळवून देण्याचा बहुमान महाराष्ट्र राज्याला मिळवून दिला आहे. हरियाणा विरुद्ध महाराष्ट्राचा संघ खेळत असताना ध्रुव मेहरणे, चार गडी बाद केले. तर हिमाचल विरुद्ध ऋनीता पाटील ने सात गडी बाद केले होते.
महाराष्ट्राच्या संघात पालघर जिल्ह्यातल्या ह.म.पंडित विद्यालयाची खेळाडू ऋणिता पाटील आणि श्रॉफ विद्यालयाचा खेळाडू ध्रुव मेहरणे यांची निवड करण्यात आली होती. या दोन्ही खेळाडूंनी महाराष्ट्रासाठी उल्लेखनीय खेळ करून महाराष्ट्राला रोप्य पदक मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला आहे.
पालघर जिल्ह्यातले खेळाडू मलेशियात करणार भारताचं प्रतिनिधित्व
त्यांच्या या तुफान खेळी बद्दल पालघरचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा क्रीडा परिषद अध्यक्ष गोविंद बोडके यांच्या हस्ते दोन्ही गुणवंत खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. यावेळी ह.म पंडित विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मधुमती कुलकर्णी, सुचिता पाटील, जिल्हा क्रीडा समन्वयक आशिष पाटील, क्रीडा मार्गदर्शक विशाल पाटील, अमृत घाडगे, प्रतिश पाटील, भक्ति अंब्रे तसचं जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास व्हनमाने आदी उपस्थित होते.
पालघर जिल्ह्यातल्या खेळाडूंची कामगिरी पाहता, पालघर जिल्हा नक्कीच ऑलिंपिक पर्यंत पोहोचेल याबाबत कोणती ही शंका नाही. पालघर जिल्ह्यातल्या खेळाडूंना आवश्यक ती मदत जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात येईल असं यावेळी यावेळी जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी सांगितलं.