पालघर : समुद्रात मासेमारी करण्यासाठी गेलेल्या गुजरात मधल्या नामे निराली या बोटीचा मासेमारी करून परतत असताना अपघात झाला. या अपघातात पालघर जिल्ह्यातल्या झाई इथल्या चार मच्छीमार खलाशांचा बुडून मृत्यू झाला आहे.
गुजरात मधली नामे निराली हे बोट 18 फेब्रुवारी ला दहा खलाशांसह खोल समुद्रात मासेमारीसाठी गेली होती . मात्र ती परतत असताना या बोटीचा भीषण अपघात झाला. या अपघातात पालघर जिल्ह्यातल्या घोलवड पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या झाई इथल्या चार खलासांचा बुडून मृत्यू झाला तर याच भागातल्या दोन खलाशांना जखमी अवस्थेत बाहेर काढण्यात गुजरात सरकारला यश आलं आहे.
पहा व्हिडीओ :
अक्षय वाघात, अमित सुरम, सुरज वळवी, सूर्या शिंगडा अशी चार मयत मच्छीमार खलाशांची नाव असून अनिल वांगड आणि जलाराम वळवी अशी जखमी अवस्थेत बाहेर काढण्यात आलेल्या खलाशांची नावे आहेत. या अपघातात एकाच परिसरातल्या तब्बल चार जणांचा मृत्यू झाल्यानं परिसरातून सध्या हळहळ व्यक्त होत आहे.
पालघरच्या ग्रामीण भागातले शेकडो खलाशी हे रोजगारासाठी गुजरात मधल्या मासेमारी बोटींवर खलाशी म्हणून काम करतात. मात्र या दुर्घटनेनंतर त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.