पालघर : INTERNATIONAL BOOK OF RECORDS मध्ये सर्वात जास्त स्वयंसेवकांचा सहभाग, सर्वोच्च कचरा संकलन तसचं प्लास्टिक कचऱ्याचं Live Recycling या तीन श्रेणीमध्ये वसई विरार महानगरपालिकेला मानांकन प्राप्त झालं आहे.
आंतरराष्ट्रीय किनारपट्टी स्वच्छता दिनानिमित्त (International Coastal Cleanup Day – ICCD) वसई विरार शहर महानगरपालिका आणि गो-शुन्य प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमानं शहरात स्वच्छता मोहिम राबविण्यात आली होती.
या मोहिमे अंतर्गत शहरातील स्वयंसेवक, शाळा, महाविद्यालये, NCC आणि NSS चे विद्यार्थी, महिला बचतगट, लोकप्रतिनिधी, सामान्य नागरीक तसचं महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचारी वर्ग असे जवळपास 15,000 हून अधिक लोकं सहभागी झाले होते. यावेळी एकुण 53 मेट्रिक टन कचरा संकलन करून त्यातलं 662 कि.ग्र. प्लास्टिक कचऱ्याचं रिसायकल प्रात्याक्षिक नागरीकांना दाखविण्यात आलं.
दरम्यान INTERNATIONAL BOOK OF RECORDS द्वारे या कार्याची दखल घेतली गेल्याने पालिकेला हे मानांकन प्राप्त झालं आहे.