पालघर : पालघर जिल्ह्यातल्या तारापूर ( Tarapur ) जवळील कुडन इथे तलावात हजारो मृत माशांचा खच आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. कुडनच्या माळी स्टॉप जवळ असलेल्या तलावात या मृत माशांचा खच दिसून आला आहे. ही घटना तारापूर भागातली असल्यामुळे रात्रीच्या वेळी बोईसर – तारापूर एमआयडीसी ( Tarapur MIDC ) मधल्या केमिकल माफियांकडून तलावात केमिकल सोडल्याचा संशय आता व्यक्त केला जात आहे.
पहा व्हिडीओ :
अनेकदा तारापूर एमआयडीसी मधून निघणार केमिकल हे रात्रीच्या वेळी लपुनछपून केमिकल माफियांच्या माध्यमातून जवळपासच्या भागात असलेल्या जल स्रोतांमध्ये सोडलं जात असल्याचे प्रकार समोर येत असतात. त्यामुळे नैसर्गिक नाल्यांमधून रात्रीच्या वेळी केमिकल सोडलं जात असल्याने माशांचा मृत्यू झाल्याचा संशय स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये देखील भीतीच वातावरण निर्माण झालं आहे.