पालघर : दरवर्षी २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन ( International Yoga Day ) म्हणून साजरा केला जातो. त्याअनुषंगाने भारतीय तटरक्षक दलाच्या डहाणू स्टेशन ( Indian Coast Guard Dahanu Station ) मध्ये आयुष मंत्रालयाच्या “एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी योग” या थीम खाली ११ वा आंतरराष्ट्रीय योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमात शारीरिक आणि मानसिक आरोग्य,पर्यावरणीय सुसंवाद वाढविण्यासाठी योगाचे समग्र फायदे आदी विषयी मार्गदर्शन करण्यात आलं. यावेळी आयसीजी (ICG) च्या कर्मचाऱ्यांनी आणि सीजीडब्ल्यूडब्ल्यूए (CGWWA) सदस्यांनी विविध आसने आणि प्राणायाम केले.
तसचं यावेळी शिस्त आणि संतुलन वाढविण्यात योगाची असलेली भूमिका समजावून सांगण्यात आली. या कार्यक्रमाने केवळ निरोगी जीवनशैलीचं महत्त्व अधोरेखित केलं नाही तर मानवता आणि निसर्ग यांच्यातील सुसंवादाचा जागतिक संदेश देखील दिला.