पालघर : प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी CSR ची संकल्पना आणली, त्यामुळे अनेक मोठया कंपन्याची संख्या आणि प्रमाण वाढले असल्याचं सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम ( सार्वजनिक उपक्रम ) राज्यमंत्री मेघना साकोरे – बोर्डीकर ( Minister of State for Public Health and Family Welfare, Water Supply and Sanitation, Energy, Women and Child Development, Public Works (Public Undertakings), Meghna Sakore – Bordikar ) यांनी सांगितलं. लुपिन फाउंडेशन अंतर्गत मोबाईल व्हॅनचा उद्घाटन सोहळा पालघर जिल्ह्यातल्या वाडा तालुक्या मधल्या गोऱ्हे प्राथमिक आरोग्य केंद्र ( Gorhe Primary Health Center ) इथं पार पडला. यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना त्या म्हणाल्या की, लुपीन आणि पालघर यांच नातं अनेक वर्षांपासून असून लुपीन फाऊंडेशन हे पालघरच्या आदिवासी पाड्यांवरती राहणाऱ्या जनतेसाठी काम करत आहे. लुपीन पालघर मध्ये शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मोगरा लागवड करून घेत आहे. तसचं आदीवासी पाड्यांवरील महिलांना विविध प्रकारचं प्रशिक्षण देऊन त्यांना सुद्धा बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचं काम हे लुपीन फाऊंडेशन करत असल्याचं मत यावेळी राज्यमंत्री मेघना साकोरे –बोर्डीकर यांनी व्यक्त केलं.
रूटीन आणि काही महत्वाच्या तपासण्या या मोबाईल वॅन ( Mobile Van ) च्या माध्यमातून पालघर जिल्ह्यातल्या वाडा, जव्हार, मोखाडा यासारख्या अतिदुर्गम भागात केल्या जाऊ शकणार आहेत.
पालघर जिल्ह्यातल्या जनतेच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी मी कटीबद्ध आहे. पालघर जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय व्हावं यासाठी मी प्रयत्नशील आहे. त्याचबरोबर आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील असेन असं ही यावेळी राज्यमंत्री मेघना साकोरे – बोर्डीकर यांनी सांगितलं.