पालघर : पालघर जिल्ह्यात ( Palghar district ) आज सकाळपासून मुसळधार पावसाची ( Heavy Rainfall ) संततधार सुरू असून जनजीवनावर त्याचा मोठा परिणाम झाला आहे. भारतीय हवामान विभागाने ( India Meteorological Department ) जिल्ह्यासाठी आज आणि उद्याचा रेड अलर्ट ( Red Alert ) जारी केला असून, मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. अनेक सखल भाग जलमय झाले असून, प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
पहा व्हिडीओ ….
सकाळपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पालघर जिल्ह्यातील अनेक सखल भागातील रस्ते आणि पूल पाण्याखाली गेले आहेत. मुंबई–अहमदाबाद महामार्गालगतच्या ( Mumbai-Ahmedabad Highway ) अनेक ठिकाणी पाणी साचल्याने ( Waterlogging ) वाहतुकीवर परिणाम झाला असून वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. जिल्ह्यातले नदी-नाले ( Rivers and streams ) दुथडी भरून वाहत असून अनेक भागांत पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.
सुर्या प्रकल्पातील ( Surya Project ) धामणी धरणाच्या ( Dhamni Dam ) पाणीपातळीत ही वाढ झाली आहे. हवामान विभागाच्या रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने ( District Administration ) खबरदारीचा उपाय म्हणून आज जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. तसचं अत्यावश्यक कामाशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये, नदी-नाल्यांच्या परिसरात जाणे टाळावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
















