पालघर : क्रीडा क्षेत्रातील कामगिरी उंचावणं आणि दर्जेदार खेळाडु, क्रीडा संधी निर्माण करणं या उद्देशानं शासनानं राज्यात आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ स्थापन केलं आहे. या क्रीडा विद्यापीठाचं बोधचिन्ह ठरविण्यासाठी एका स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यामुळे या स्पर्धेत पालघर जिल्ह्यातल्या नागरिकांनी सहभागी व्हावं असं आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी शरद कलावंत यांनी केलं आहे.
राज्याची क्रीडा विषयक कामगिरी उंचावणं, क्रीडा क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर उपलब्ध असलेली प्रशिक्षणाची क्षेत्रे विचारात घेऊन नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात आणि तरुण वर्गास क्रीडा क्षेत्रात येण्यास प्रोत्साहन मिळावं. या अनुषंगानं राज्यात दर्जेदार मार्गदर्शक निर्माण होऊन खेळांडुना तंत्रशूध्द प्रशिक्षण मिळावं हा या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा विद्यापीठाच्या निर्मितीचा उद्देश आहे.
या आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाचं बोधचिन्ह (LOGO) ठरविण्यासाठी स्पर्धा आयोजित करण्यात आली असून या स्पर्धेच्या नियम, अटी व पुरस्कार विषयक माहिती क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या https://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
या स्पर्धेत भारतातील कोणी ही नागरिक भाग घेऊ शकतात. तसचं या स्पर्धेसाठीचं आपलं बोधचिन्ह (LOGO) तयार करुन ते 10 ऑगस्ट पर्यंत पाठवता येऊ शकेल. या स्पर्धेतील प्रथम, व्दितीय आणि तृतीय क्रमाकांच्या विजेत्यांना 50 हजार रूपये, 30 हजार रूपये आणि 20 हजार रुपये पारितोषिक म्हणून देण्यात करण्यात येणार आहे.