पालघर : पालघर जिह्यात झपाट्यानं नागरीकरण वाढत आहे. आणि विशेषतः बोईसर आणि पालघर इथं वाढलेली प्रचंड लोकसंख्या, औद्योगिक वसाहती यांमुळे गुन्ह्यांचे प्रकारही वाढत आहेत. यात महिलांच्या चेन स्नाचिंग च्या प्रकरणातही वाढ झाली आहे. बोईसर किंवा पालघर इथं गुन्हे करणारे आरोपी बोईसर – पालघर मधले मुख्य रस्ते किंवा बोईसर ओव्हर ब्रिजचा वापर करून पसार होण्यात यशस्वी होतात.
त्यामुळेच पालघर, बोईसर मध्ये घडण्याऱ्या गुन्ह्यांची उकल होण्यात पोलीसांना सहकार्य ह्वावं यादृष्टीनं सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे बोईसर मधले निर्धार संघटनेचे प्रमुख कुंदन संखे यांनी पुढाकार घेत त्यांच्या वाढदिवसा निमित्त बोईसर – पालघर मुख्य रस्त्यावर सीसीटीव्ही कॅमरे बसवले. याचं उदघाटन बोईसर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शाळुंके यांच्या हस्ते करण्यात आलं.यावेळी कुंदन संखे यांनी सामाजिक आणि राजकीय जीवनात वावरतांना जनतेच्या दृष्टीकोनातून भूमिका बजावणं हे आपलं कर्तव्य असून यापुढेही ते सदैव सुरू राहणार असल्याचं मत व्यक्त केलं.
यावेळी विद्या नगर मंडळाचे अध्यक्ष मनोहर चुरी, शिवसेना उपतालुकाप्रमुख वैभव भोईर, ग्रामपंचायत सदस्य काशीनाथ संखे, किरण महाले, संजय संखे, रुपेश संखे, योगेश राऊत, तन्मय संखे, गिरीश शिंदे, ऍड. तृप्ती संखे, कैलास नाईक, प्रणित संखे आदी उपस्थित होते.