पालघर : साथीच्या रोगाशी संबंधीत उद्भवलेल्या परिस्थितीत आरोग्य आणि वैद्यकीय क्षेत्राला कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावं यासाठी राज्यातल्या आरोग्य क्षेत्रात काम करण्यास इच्छूक असलेल्या १८ ते ४५ वयोगटातल्या युवक-युवतींना हेल्थकेअर क्षेत्रामध्ये कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी प्रधानमंत्री कौशल्य विकास कार्यक्रम 3.0 अंतर्गत आरोग्य अभियानांतर्गत Customised Crash Course Programme for COVID Warriors राबविण्यात येणार आहे.
यासंदर्भात पालघर जिल्ह्यातल्या कौशल्य विकास योजनेअंतर्गत मोफत प्रशिक्षण घेण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांनी https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdFA1W1hv1rkBFAKP3_izV9x8oSENP3HiXR1H5MFV0dhq9BtA/viewform या फॉर्म मध्ये आपली माहिती भरावयाची आहे