पालघर : त्रिपुरामध्ये कोणतीही अनुचित घटना घडली नसताना जगात कोठे तरी मशिदीची नासधूस झाल्याची क्लिप व्हायरल करून महाराष्ट्रात मालेगाव, अमरावती आणि नांदेड मध्ये घडलेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ सोमवारी पालघर मध्ये भाजपकडून जिल्हाध्यक्ष नंदकुमार पाटील ह्याच्या नेतृत्वाखाली पालघर मधल्या चार रस्ता इथं धरणे आंदोलन करण्यात आलं. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ही तैनात ठेवण्यात आला होता
यावेळी प्रदेश सरचिटणीस, कोकण प्रभारी, माजी मंत्री आमदार रवींद्र चव्हाण, पालघर जिल्हा प्रभारी आमदार संजय केळकर इतर कार्यकर्ते आदी उपस्थित होते. जी घटना त्रिपुरा मध्ये घडलीच नाही त्या घटनेबद्दल राहुल गांधी ट्विट करतात त्यामुळे राहुल गांधींवर सुद्धा गुन्हा दाखल केला पाहिजे अशी प्रतिक्रिया यावेळी पालघर जिल्हा प्रभारी आमदार संजय केळकर यांनी दिली.
त्रिपुरात घडलेल्या घटनेच्या आधारे मालेगाव, अमरावती आणि नांदेड मध्ये अफवा पसरवून धार्मिक भावना भडकवून दंगल घडविण्याच्या प्रकाराची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या मार्फत करावी, ही दंगल घडविणाऱ्या सूत्रधारांना आणि त्यांच्या समर्थकांना अटक करावी, दंगलीत हात असलेल्या रझा अकादमीवर बंदी घालावी, स्वसंरक्षणासाठी उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरलेल्या नागरिकांवरील कारवाई बंद करावी, भारतीय जनता पार्टीच्या नेते – कार्यकर्त्यांवरील पूर्वग्रहदूषित कारवाई थांबवावी आणि त्यांच्याविरोधात दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत अशा विविध मागण्यांसाठी हे धरणे आंदोलन करण्यात आलं. आणि या मागण्यां संदर्भातलं निवेदन देखील आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं.