पालघर : पालघर मधल्या कुबेर शॉपिंग सेंटर मध्ये अचानक आग लागल्यानं दोन दुकानं जळून खाक झाली. सोमवारी सकाळी 9 वाजताच्या दरम्यान कुबेर शॉपिंग सेंटर मधल्या एका साडीच्या दुकानात शॉर्टसर्किट झाल्यानं आग लागली. ही आग इतकी भीषण होती की त्यामुळे पहिल्या मजल्यावरच्या बुटाच्या दुकानाला ही आग लागली. मिळालेल्या माहितीनुसार ही आग शॉर्टसर्किट मुळे लागल्याचं सांगण्यात येत आहे.मात्र या आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाहीये.
घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. आणि अग्निशमन दलाच्या जवांना या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं.