मुंबई : मुंबईतील मोनो रेल मध्ये आज सकाळी अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने अनेक प्रवासी अड्कले होते. अँटॉप हिल बस डेपो आणि जीटीबीएन मोनोरेल स्टेशन (वडाळा) दरम्यान सकाळी सव्वासात वाजताच्या दरम्यान ही मोनोरेल बंद पडली. त्यामुळे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागला.
पहा व्हिडीओ :
मोनो रेल अचानक थांबल्याने जवळपास १७ प्रवासी डब्यांमध्ये अडकले होते. माहिती मिळताच नियंत्रण कक्षाकडून बचाव कार्य सुरू करण्यात आले. त्यानंतर सकाळी ८ वाजेपर्यंत सर्व १७ प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं आणि त्यांना दुसऱ्या मोनो रेल मध्ये हलवण्यात आले. तब्बल अडीच तासानंतर ही मोनोरेल सुरू झाली.

















