पालघर : पालघर जिल्ह्यातल्या विरार मध्ये रमाबाई अपार्टमेंट ही चार मजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 15 जणांचा मृत्यु झाला आहे. मंगळवारी रात्री १२ वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. मंगळवारी रात्रीपासुन महानगरपालिका आणि एन.डी.आर.एफ च्या 2 टीम यांच्या माध्यमातुन घटनास्थळी मलब्या खालून नागरिकांना शोधण्याचं कार्य सुरू होत.
पहा व्हिडीओ :
विरार मधल्या नारंगी इथल्या रमाबाई अपार्टमेंट या चार मजली इमारतीचा मागील भाग खाली असलेल्या चाळीवर कोसळून ही दुर्घटना घडली. ती चाळ पूणपणे उध्वस्त झाली. या अपार्टमेंट मध्ये ५० सदनिका होत्या. त्यापैकी अंदाजे १२ सदनिका कोसळल्याची माहिती समोर येत आहे.