पालघर : संसदेतील उत्कृष्ट आणि प्रभावी कामगिरीबद्दल दिला जाणारा देशातील प्रतिष्ठित “संसद रत्न पुरस्कार २०२६” ( Sansad Ratna Award 2026 ) यंदा पालघर लोकसभा मतदारसंघाचे ( Palghar Lok Sabha constituency ) खासदार डॉ. हेमंत विष्णू सवरा ( Member of Parliament Dr. Hemant Vishnu Savara ) यांना जाहीर झाला आहे. महाराष्ट्रातील ( Maharashtra )केवळ पाच खासदारांना हा मानाचा पुरस्कार मिळाला असून, त्यामध्ये डॉ. सवरा यांचा समावेश असल्यानं पालघर जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
२०२६ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापर्यंत संसदेतील उत्कृष्ट उपस्थिती, प्रभावी मांडणी, जनहिताचे प्रश्न आणि संसदीय कामगिरीच्या आधारे संसद रत्न पुरस्कार समितीने ही निवड जाहीर केली आहे.
पालघरच्या जनतेचे प्रश्न संसदेत ठामपणे मांडत विकासासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या डॉ. हेमंत विष्णू सवरा यांच्या कार्याची ही राष्ट्रीय स्तरावरील दखल मानली जात आहे.
यंदाचा १६ वा संसद रत्न पुरस्कार सोहळा जुलै २०२६ मध्ये नवी दिल्ली इथे पार पडणार आहे. देशभरातील निवडक खासदारांमध्ये पालघरच्या खासदारांचा गौरव होणे ही संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे.
















