वाशिम / सुनिल कांबळे : राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे हे गुरुवार पासून वाशिम जिल्ह्यात खासगी दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज पहाटे नववर्षाच्या पहिल्या दिवशी वाशिम येथील ऐतिहासिक बालाजी मंदिराला भेट देऊन दर्शन घेऊन तेथे विधिवत पूजा – अर्चना केली. आणि आपल्या नववर्षाचा प्रारंभ केला. यावेळी त्यांनी नवीन वर्षात राज्यात सुख – समृद्धी नांदो त्याचबरोबर राज्यातील जनतेच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना केली.
त्यानंतर त्यांनी बंजारा समाजाची काशी असलेल्या जिल्ह्यातील पोहरादेवी येथील जगदंबा मातेच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले. तसेच बंजारा समाजाचे श्रध्दा स्थान संत सेवालाल महाराज आणि धर्मगुरू डॉ. रामराव महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतलं. महाराजांचे उत्तर अधिकारी बाबूसिंग महाराजांची त्यांनी भेट घेऊन पोहरादेवी या धार्मिक पर्यटन स्थळाच्या विकास विषयक योजनांची माहिती घेतली. तेथे सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. या वेळी जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे हे उपस्थित होते.