वाशिम / सुनिल कांबळे : कोरोना संसर्गाच्या काळात संपूर्ण देशात लावण्यात आलेला लॉक डाऊन हा शब्द ह्या नऊ महिन्याच्या काळात मोठ्या प्रमाणात वापरला गेला आहे. याच शब्दावरून वाशिम शहरातील “ड्रीम लँड सिटी” या नवीन वसाहती मधल्या जनतेने लोक सहभागातून निर्माण केलेल्या बागेला “लॉक डाऊन गार्डन” असे नाव देण्यात आलं आहे. आणि त्यामध्येच नववर्षाच्या स्वागताचा कार्यक्रम ठेऊन नगर वासीयांनी 2021 या नववर्षाचे स्वागत केले.
आरोग्यमंत्र्यांनी केली राज्यातील जनतेच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना
या वसाहती साठी असलेल्या मोकळ्या जागेवर लॉक डाऊन च्या काळात वृक्ष लावून त्यांचं संगोपन करण्यात आल. तसेच लोकसहभागातून जमा झालेल्या पैशातून बसण्यासाठी बेंच, मुलांसाठी क्रीडा साहित्य आणून हे गार्डन सुरू करण्यात आले आहे. आणि नववर्षाचं औचित्य साधत इथल्या नगर वासीयांनी येथे नववर्षाचे स्वागत करून ह्या गार्डनचा लोकार्पण सोहळा पार पडला.