पालघर / नीता चौरे : कोविड-19 साथीच्या रोगाची सुरुवात झाली तेव्हा पासून राज्यात ई – संजीवनी ओपीडी ऑनलाईन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. राज्यातल्या जनतेला घरीच सुरक्षित राहून वैद्यकीय अधिका-यांन मार्फ़त उपचारावर सल्लामसलत करता यावी हा या कार्यक्रर्माचा मूळ उद्देश्य आहे. यासेवेत जनरल ओपीडीसह विशेषज्ञ ओपीडीचा समावेश आहे.
इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्र राज्याची कामगिरी अधिक चांगली करण्यासाठी राज्यातली सर्व जिल्हा रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, सुपर स्पेशलिटी रुग्णालये, मनोरुग्णालये, टीबी रुग्णालये, ऑथॉपेडिक रुग्णालये, महिला रुग्णालये इथले सर्व वैद्यकीय अधिकारी, विशेषज्ञ ई – संजीवनी ओपीडी मध्ये नोंदणी करण्यात अली आहे.
त्यानुसार पालघर जिल्ह्यातल्या 59 विशेषज्ञ ( बालरोगत तज्ञ, स्त्रीरोग तज्ञ आणि इतर ) तथा वैद्यकीय अधिका-यांची नोंदणी करण्यात आली असून ही सेवा विनामुल्य कार्यान्वित झाली आहे. यासाठी esanjeevaniopd.in या वेबसाईटवर नोंदणी करावी लागणार आहे. या ई – संजीवनी ओपीडीची वेळ ही सकाळी 9 वाजता पासून ते दुपारी 1 वाजेपर्यंत आणि त्यानंतर 1.45 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत अशी असून या वेळेत लोकं उपचाराबाबत वैद्यकीय अधिका-यांकडून सल्ला घेवु शकतील. या सुविधेचा लाभ जास्तीत जास्त जनतेनं घ्यावा असं आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अनिल थोरात, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.राजेंद्र केळकर आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद सूर्यवंशी यांनी केलं आहे.