मीरारोड : सरते वर्ष सर्वांसाठीच कठीण काळ होता आणि या दरम्यान प्रत्येकाने आपल्याला शक्य होईल तशी गरजूला मदत आणि आधार दिला आहे. आणि ही बांधिलकी अशीच प्रत्येकाने जपली असा संदेश देत मीरारोड येथील वोक्हार्ट रूग्णालयाने अनोख्या पद्धतीने नववर्षाचे स्वागत केले आहे. वोक्हार्ट रूग्णालयातील केंद्र प्रमुख डॉ. पंकज धामिजा यांच्या नेतृत्वाखाली रूग्णालयातील पथकाने आश्रय आकृति फाउंडेशन पुनर्वसन केंद्राला भेट देऊन समाजापासून वंचित असलेल्या लहान मुलांना जीवनावश्यक वस्तूंचे वापट केले आहे.
मीरा रोड येथील वोकहार्ट हॉस्पिटलच केंद्र प्रमुख डॉ. पंकज धामिजा म्हणाले की, गेल्या अनेक महिन्यांपासून प्रत्येक जण कोरोना व्हायरस विरोधात लढा देत आहेत. पण आता लवकरच नवीन वर्षाला सुरूवात होत आहे. हे नवे वर्ष अनोख्या पद्धतीने साजर करण्याचा आम्ही निर्णय घेतला. त्यानुसार आश्रय आकृति फाउंडेशन पुनर्वसन केंद्रातील मुलांना कपडे आणि खाण्यासारख्या मूलभूत गोष्टींचे वाटप केले.
कोरोनाच्या भितीमुळे या मुलांना बाहेर पडता येत नव्हतं. परंतु, या नववर्षाच्या निमित्ताने त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले होते. या मुलांसोबत वेळ घालवून त्यांना एक अविस्मरणीय अनुभव देण्याचा आमचा प्रयत्न होता. त्यानुसार या लहान मुलांसोबत एक वेगळ्या पद्धतीने नववर्षांचे स्वागत केले आहे. असे डॉ. धामिजा यांनी सांगितले.