नीता चौरे / पालघर : पालघर जिल्ह्यातल्या वसई-विरार महानगरपालिकेच्या परिवहन सेवेच्या नूतनीकरणाचा सोहळा मंगळवारी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडला.
वसई – विरारच्या परिवहन सेवेत 30 अद्यावत बसेस दाखल झाल्यात. 43 मार्गावर या बसेस धावणार असून ठेकेदाराच्या बसेस, मेंटेनन्स, लागणारे इंधन हे बूम ( बाय ऑन ऑपरेटर आणि मेंटेनन्स ) तत्वावर असून पालिकेचा एकही पैसा न खर्च करता परिवहन सेवा देणारी ही महाराष्ट्रातील पहिली परिवहन सेवा असल्याचं खासदार गावित यांनी यावेळी सांगितलं.
यावेळी खासदार राजेंद्र गावित, आमदार रवींद्र फाटक, श्रीनिवास वनगा, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन नाईक,कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष ओनील अल्मेडा, जिल्हाधिकारी माणिक गुरसळ, शिवसेना जिल्हाप्रमुख वसंत चव्हाण आदी उपस्थित होते.