पालघर : औरंगाबाद नामकरणावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली असून आज सकाळी जवळपास सहा वाजताच्या दरम्यान पालघरच्या एसटी बस डेपोतुन औरंगाबाद ला जाणारी बस मनसे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 10 ते 12 कार्यकर्त्यांनी अडवली. आणि मग औरंगाबाद बस वर छत्रपती संभाजीनगर नावाची पाटी लावून मगच बस पुढे रवाना होऊ दिली. 26 जानेवारी पर्यँत जर औरंगाबादचं नामकरण छत्रपती संभाजीनगर नामकरण असं झाली नाही तर राज ठाकरे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र आंदोलन छेड़ेल असा इशारा मनसेने दिला आहे.
यावेळी मनसे पालघर उपशहर अध्यक्ष मिथुन चौधरी, कुणाल कुंटे, निशांत धोत्रे, विभाग अध्यक्ष नयन पाटील, राहुल खारे, धवल आशर, मनविसे शहर अध्यक्ष निखिल पामाळे, शहर सचिव विशाल पवार, उपशहर अध्यक्ष अक्षय कोकणे, सचिन मारकड, शाखा अध्यक्ष साईश नारगोळकर, अमित यादव आदी उपस्थित होते.