पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालयात विद्यार्थाशी साधला संवाद
पालघर : केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री जयंत चौधरी हे आज पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी पालघर जिल्ह्यातल्या सातपाटी इथं असलेल्या पी एम श्री जवाहर नवोदय विद्यालयात शिक्षकांशी आणि विद्यार्थाशी संवाद साधला. दरम्यान त्यांनी या विद्यालयात गेल्या १० वर्षांपासून कार्यरत असलेल्या सर्वात जुन्या महिला कर्मचारी यांच्याशी आवर्जून बातचीत केली.
बहुचर्चित वाढवण बंदराचा मार्ग अखेर मोकळा, पालघर मध्ये पंतप्रधानांच्या हस्ते होणार भूमिपूजन…
यावेळी त्यांनी विद्यालय प्रशासनाकडून असलेल्या समस्या जाणून घेतल्या. त्याचबरोबर विद्यालयात लावण्यात आलेल्या कला प्रदर्शनाला ही त्यांनी भेट दिली. विद्यालयातल्या मुलांनी यावेळी म्युजिकल रूम मध्ये केंद्रीय मंत्र्याचं वाद्याच्या आणि संगीताच्या माध्यामतून विशेष स्वागत केलं. दरम्यान यावेळी केंद्रीय राज्यमंत्री जयंत यांनी प्यानो वाजवून मुलांसोबत संगीताचा आनंद ही लुटला. यावेळी त्यांनी विद्यालयात लावलेल्या विविध प्रदर्शनाची पाहणी करून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. याचं पी एम श्री जवाहर नवोदय विद्यालयातून शिक्षण घेवून विविध ठिकाणी परदेशात नोकरी करत असलेल्या पालघरच्या जुन्या विद्यार्थ्यांशी त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग च्या माध्यामतून बातचीत केली. त्यानंतर त्यांनी विद्यालयातल्या मेस मध्ये बसून विद्यार्थ्यासोबत चर्चा करत जेवणाचा आस्वाद घेतला.
यावेळी बोलताना त्यांनी सांगितलं कि, या विद्यालयातल्या विद्यार्थ्यांनी ज्याप्रकारे विविध प्रदर्शन लावून त्यांनी माहिती दिली ते पाहून हे दिसून आलं कि इथल्या विद्यार्थ्यामध्ये अनेक कलागुण आहेत. देशात साडे सहाशे नवोदय विद्यालये आहेत. या विद्यालयातून शिक्षण घेवून अनेक विद्यार्थी देशात आणि परदेशात विविध पदावर कार्यरत आहेत. त्यामुळे देशाला या नवोदय संस्थेवर गर्व आहे. शिक्षणाचा दर्जा सुधारण्यावर आम्ही भर देत आहोत. मुलांना बेस्ट स्कील आणि फ्युचर स्कील देण्याचा प्रयत्न आम्ही आमच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाच्या माध्यामतून करत आहोत.