केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी घेतला कार्यक्रम स्थळाचा आढावा
पालघर : बंदरे, जहाज वाहतूक आणि जलमार्ग मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल हे आज पालघर जिल्ह्याच्या दौ-यावर आले होते. दरम्यान त्यांनी आज पालघर जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसह पालघर मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते यांच्या 30 ऑगस्ट ला पालघर मध्ये होणा-या वाढवण बंदराच्या भूमिपूजन कार्यक्रम स्थळाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी वाढवण बंदराचा भूमिपूजन कार्यक्रम ज्या सिडको मैदानावर होणार आहे त्या ठिकाणी जावून कार्यक्रम स्थळाची पाहणी केली. तसचं त्यांनी कोळगावच्या पोलीस परेड मैदानांवर प्रधानमंत्र्यांच्या कार्यक्रमासाठी तयार होत असलेल्या हेलिपॅडची ही पाहणी देखील केली. 30 ऑगस्ट ला पालघर मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाढवण बंदराचा भूमिपूजन सोहळा पार पडणार आहे. त्यासाठी संपूर्ण जिल्हा प्रशासन सज्ज झालं आहे.