पालघर : महाराष्ट्र शासन मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ आणि सोनोपंत दांडेकर महाविद्यालय, पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी विश्वकोशासाठी नोंदलेखन कार्यशाळा १५ सप्टेंबर ला पालघरच्या सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात आयोजित करण्यात आली आहे. मराठी विश्वकोशासाठी नवीन नोंदी तयार करण्यासाठी आवश्यक लेखन कौशल्याचं प्रशिक्षण देण्यासाठी या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे.
या कार्यशाळेस प्रमुख उपस्थिती म्हणून महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे सचिव डॉ. शामकांत देवरे, सहायक सचिव ललित कुडमथे, दांडेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण सावे उपस्थित राहणार आहेत.
मार्गदर्शनासाठी मुंबई विद्यापीठाच्या तत्वज्ञान विभागातील प्राध्यापक डॉ. मीनल कातरणीकर तसचं महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे विद्याव्यासंगी सहाय्यक आनंद गेडाम उपस्थित राहणार आहेत.
मराठी विश्वकोश हे ज्ञानवृद्धीचे एक महत्त्वाचे साधन आहे आणि त्यात योगदान देण्याची संधी प्राध्यापकांना मिळणार असल्यानं सामाजिक शास्त्रामध्ये लेखन करू इच्छिणाऱ्या प्राध्यापकांनी या कार्यशाळेस उपस्थित रहावं असं आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण सावे यांनी केलं आहे.

















