सूर्या नदीत 40 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू
पालघर : पालघर जिल्ह्यात मध्यरात्रीपासून अनेक भागांत जोरदार पाऊस बरसत आहे. सध्या हवामान खात्याकडून जिल्ह्यासाठी पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. सतत होत असलेल्या पावसामुळे पालघर जिल्ह्यातल्या धरण क्षेत्रातील पाणी पातळीत वाढ झाली असून सूर्या प्रकल्पाच्या धामणी धरणाचे पाच ही दरवाजे उघडण्यात आले आहेत.
पहा व्हिडीओ :
धामणी आणि कवडास या धरणांमधून सूर्या नदीत चाळीस हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे सूर्या नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झालेली दिसून येत आहे. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यात अजूनही चांगला पाऊस सुरूच आहे.