केळवे ग्रामस्थांच्या व्यथा
पालघर : पालघर जिल्ह्यातलं केळवे गाव. जे आपल्या नैसर्गिक सौंदर्यामुळे एक सुप्रसिद्ध पर्यटन म्हणून पालघर जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. मात्र याच केलेवे भागात स्मशानभूमीचा अभाव असल्याचं चित्र समोर आलं आहे. या गावातल्या नागरिकां आज देखील एक स्मशानभूमी बनवून देण्यात आलेली नाही. ज्याची मागणी इथले नागरिक सतत प्रशासनाकडे करीत आहेत. मात्र तरी देखील या महत्वाच्या सुविधेकडे प्रशासनाचं पूर्णपणे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे.
हे केळवे गावचं नव्हे तर पालघर जिल्ह्यातल्या अनेक भागातल्या गावा पाड्यात आज ही स्मशानभूमी नसल्याची समस्या वारंवार समोर येते. विशेष करून पावसाळ्याच्या दिवसात ज्यावेळी मृतदेहाला स्मशानभूमी नसल्याने मरणानंतर देखील मरण यातना सहन कराव्या लागतात. आणि दृश्य अगदी मनाला हेलावून टाकणारी असतात.
केळवे ग्रामपंचायतीने या समस्येवर अनेक वेळा स्थानिक प्रशासनाशी पत्रव्यवहार केला आहे. मात्र तरी देखील या पत्रव्यवहारांना कोणतीही सकारात्मक उत्तर मिळाली नाहीत. पालकमंत्र्यांच्या मोठ्या जनता दरबारातही या समस्येवर चर्चा झाली. तरी देखील कार्यवाहीचे कोणतेही संकेत दिसून आले नाहीत.
गावकऱ्यांनी याविषयी माहिती देताना सांगितलं की, आमदार आणि खासदारांना प्रत्यक्ष भेटून ही स्मशानभूमीसाठी निधी उपलब्ध करण्यासंदर्भात कोणतीही दखल घेतली गेली नाही, ज्यामुळे स्थानिक प्रशासनाची असंवेदनशीलता स्पष्ट होते.
केळवे सारख्या पर्यटन स्थळावर, जिथे अनेक पर्यटक येतात, स्मशानभूमीची व्यवस्था न असणे ही एक गंभीर बाब आहे. त्यामुळे गावकऱ्यांच्या मनामध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे.
केळवे ग्रामपंचायत हद्दीत स्मशानभूमी नसलेली ठिकाणे :
दसरमाळा, केळवे
जोगाळे, केळवे
मांगेल आळी, केळवे
सुभाषनगर-भंडार आळी, केळवे
केळवे बीच मध्यवर्ती, केळवे
स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन उपाययोजना कराव्यात. केळवे ग्रामपंचायतीच्या या मागणीला प्रतिसाद देऊन, प्रशासनाने तातडीने स्मशानभूमी उभारणीसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.
“पालघर जिल्ह्यात प्रशासनाने मुंबई-बडोदरा बुलेट ट्रेनसारख्या मोठ्या प्रकल्पांवर लक्ष केंद्रित केले असताना, स्थानिक नागरी मूलभूत सुविधांकडे मात्र त्याचं दुर्लक्ष होत आहे. केलेवे सारख्या प्रसिद्ध पर्यटन स्थळी नागरिकांना स्मशानभूमी सारखी मूलभूत सुविधा न मिळणं ही अत्यंत खेदाची बाब आहे.”
सरपंच, केळवे ग्रामपंचायत