अप आणि डाऊन मार्गांवरील रेल्वे सेवा ठप्प
पालघर : पश्चिम रेल्वेची वाहतूक सेवा आज संध्याकाळी 7 वाजता पासून विस्कळीत झाली आहे. पालघर रेल्वे स्थानकात आज सायंकाळी गुजरातकडे जाणारी अजमेर बांद्रा ट्रेन 1 आणि 2 नंबर ट्रॅक क्रॉस करत असताना अचानक ओव्हर हेड वायर तुटली. त्यामुळे पश्चिम रेल्वेची अप आणि डाऊन दोन्ही मार्गावरील वाहतूक सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे.
पहा व्हिडीओ :
सध्या अजमेर बांद्रा ट्रेन दुसरं इंजिन लावून तिला बोईसर रेल्वे स्थानकात हलविण्याचे पर्यंत सुरू आहेत. त्यानंतरच हे ओव्हरहेड वायरचं काम व्यवस्थित करता येईल. सध्या विविध ट्रेन पश्चिम रेल्वेच्या विविध स्थानकांवर थांबवण्यात आल्या आहेत. तो पर्यंत पालघर, सफाळे रेल्वे स्थानकातून पर्यायी बस सेवा प्रवाश्यांना उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत.