गुजरात ते कन्याकुमारी पर्यंत करणार प्रवास
पालघर : CISF कडून आज पालघर जिल्ह्यातल्या वसई मध्ये कोस्टल सायक्लोथॉनचं आयोजन करण्यात आलं होत. सकाळी हि सायक्लोथॉन वसई हून गेटवे ऑफ इंडियाकडे रवाना झाली आहे. या मध्ये सहभागी झालेल्या सायकलिस्टनी दोन टीमच्या माध्यमातून गुजरात मधल्या लाखपात आणि पश्चिम बंगाल मधल्या भक्कली इथून आपल्या प्रवासाला सुरुवात केली होती.
आतापर्यंत या टीम नी ३३२५ किमी अंतर पार केलं आहे. आज संध्याकाळ पर्यंत हि सायक्लोथॉन गेटवे ऑफ इंडिया या ठिकाणी पोहचणार आहे. जिथे एका भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. तिथून पुढे हि 7 मार्च पासून सुरु झालेली सायकल रेली कन्याकुमारीच्या दिशेने मार्गक्रमन करणार आहे.
पहा व्हिडिओ :
किनारी भागांच्या सुरक्षतेबद्दल जागरूकता निर्माण करणे, मच्छिमार बांधवांना कायदा व अंमलबजावणी विषयी समजून सांगणे या सारख्या विषयांचं महत्व समजून सांगण्याच्या उद्देशाने या सायकल रेलीचं CISF कडून आयोजन करण्यात आलं आहे. जेणेकरून समुद्री मार्गाद्वारे होणाऱ्या अंमली पदार्थांच्या वाहतुकी, शस्त्रास्त्रे, विस्फोटकांची तस्करी या सारख्या संभाव्य धोक्यांपासून सतर्क राहता यावे. या सायकल रेलीच्या माध्यामातून त्यांनी डहाणू मधल्या किनाऱ्या लगतच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांशी, नागरिकांशी संवाद साधला. या सायक्लोथॉन मध्ये एका हजारांहून अधिक सायकलिस्टनी सहभाग घेतला आहे.