ईमेल मुळे उडाली खळबळ
पालघर : पालघरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात एका अनोळखी ईमेल आयडी वरून बॉम्ब ठेवल्याचा ई-मेल जिल्हाधिकारी कार्यालयाला आला होता. ज्यानंतर एकच खळबळ उडाली.सुरक्षेतेच्या दृष्टिकोनातून जिल्हाधिकारी कार्यालयासह परिसरातील सर्व कार्यालये खाली करण्यात आली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिस प्रशासनाकडून बॉम्ब स्कॉड, डॉग स्कॉड ला पाचारण करण्यात आलं.
पहा व्हिडिओ :
पोलिसांनी तपास केला असता या मध्ये कोणती तथ्य आढळलं नाही. आणि हा ईमेल खोटा होता अशा प्रकारची माहिती आतापर्यंत समोर आहे. या प्रकरणात पालघर पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा ईमेल नेमका कुठून आला होता याबाबत चा तपास सायबर सेल कडून करण्यात येत आहे.