पालघर : पालघर पोलीस ( Palghar Police ) दलात २९ पोलीस अंमलदारांना पदोन्नती ( Promotion ) देण्यात आली आहे.
पालघर पोलीस दलात रिक्त असलेल्या पदावर पदोन्नती देण्यासाठी पालघर चे पोलीस अधीक्षक यतिश देशमुख ( Palghar Superintendent of Police Yatish Deshmukh ) यांच्या अध्यक्षतेखाली अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे, पोलीस उप अधीक्षक (गृह) संगिता शिंदे अल्फोन्सो यांची समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून जिल्हयातल्या पदोन्नतीस पात्र सहाय्यक पोलीस उप निरीक्षक, पोलीस हवालदार, पोलीस नाईक, पोलीस अंमलदार यांची पात्रता आणि अपात्रता पडताळणी करून २९ पोलीस अंमलदारांना पदोन्नती देण्यात आली आहे.
यामध्ये १४ सहाय्यक पोलीस उप निरीक्षक यांना पोलीस उप निरीक्षक (ग्रेड PSI) या पदावर पदोन्नती, ७ पोलीस हवालदार यांना सहाय्यक पोलीस उप निरीक्षक (ASI) या पदावर पदोन्नती आणि ८ पोलीस नाईक / पोलीस शिपाई यांना पोलीस हवालदार या पदावर पदोन्नती देण्यात आली.