पालघर : पालघर मधल्या धनसार औद्योगिक क्षेत्रात असलेल्या प्लॅटिनम पॉलिमर्स आणि ॲडीटिव्हज या प्लॅस्टिक कंपनीत आज सकाळी तीन वाजताच्या दरम्यान भीषण आग लागली. बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केले, दरम्यान होत असलेल्या स्फोटांमुळ आग मोठ्या प्रमाणात पसरली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. ही आग इतकी भीषण होती की, या आगीत संपूर्ण कंपनी जळून खाक झाली आहे.
पहा व्हिडीओ :
मिळालेल्या माहितीनुसार, रात्री कंपनी सुरू असताना पीव्हीसी पावडर बनवणाऱ्या या कंपनीत तीन वाजताच्या दरम्यान ही आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही.