हरकती आणि सूचना सादर करण्यासाठी ०४ सप्टेंबर २०२५ ही अंतीम तारीख
पालघर : राज्य निवडणूक आयोगाने ( State Election Commission ) दिलेल्या आदेशानुसार वसई विरार शहर महानगरपालिका ( Vasai Virar City Municipal Corporation ) सार्वत्रिक निवडणूक -२०२५ ( General Election 2025 ) साठी प्रभाग निहाय प्रारूप प्रभाग रचना २२ ऑगस्ट २०२५ ला प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही प्रभाग निहाय प्रारूप प्रभाग रचना महानगरपालिका मुख्य कार्यालय, महानगरपालीकेच्या सर्व प्रभाग समिती कार्यालयांमध्ये (प्रभाग – ए, बी, सी, डी, ई, एच, जी, एच, आय) तसेच महानगरपालिकेच्या www.vvcmc.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
या प्रारूप प्रभाग रचनेवर कोणत्याही हरकती आणि सूचना असल्यास २२ ऑगस्ट ते ०४ सप्टेंबर २०२५ पर्यंत दुपारी ३.०० वाजेपर्यंत कार्यालयीन वेळेत वसई विरार शहर महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे निवडणूक कार्यालय अथवा संबंधित प्रभाग समिती (प्रभाग – ए, बी, सी, डी, ई, एच, जी, एच, आय) कार्यालयांत सादर कराव्यात. प्राप्त हरकती आणि सूचना दाखल करणाऱ्या नागरिकांना घेतलेल्या हरकतींवर सुनावणी साठी उपस्थित राहण्यासाठी स्वतंत्रपणे कळवण्यात येणार आहे.