पालघर : राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून पालघर जिल्ह्यातल्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे बळकटीकरण करण्यासाठी पालघर आणि डहाणू नगर परिषदेसाठी मिनी रेस्क्यू टेंडर वाहन देण्यात आली आहेत. डहाणू आणि पालघर नगर परिषदेच्या अग्निशमन दलात गुरखा दाखल झाल्यानं आता त्यांची क्षमता अधिक वाढली आहे. या वाहनांचं लोकार्पण जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांचे हस्ते करण्यात आलं.
या गाडीचा उपयोग छोट्या प्रकारच्या आग विझवण्यासाठी, व्हीआयपी ताफा, शोध आणि बचाब कार्यासाठी, वाहन अपघातात बचाव आदी साठी होऊ शकेल. 20 टनापर्यंत वजनाची गाडी लिफ्ट करण्यासाठी स्टेपनी, 50 लिटर फोम ज्याच्या सहाय्यानं केमिकल आग विझवण्यात येते, तसचं 300 लिटर पाणी क्षमतेचे हाय प्रेशर टॅक ज्याने सतत 20 मिनीटे फायर फायटिंग करता येणे, प्रोझीमीटी फायर सुट अशी विविध वैशिष्टय़ या गुरखा गाड्या मध्ये आहेत.