पालघर : पालघर जिल्हा हा आदिवासी बहुल असा जिल्हा आहे. आणि याठिकाणी आदिवासी समुदाय मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहे. पालघर जिल्हा हा नेहमीच कुपोषणाच्या समस्येबाबत चर्चेत दिसून येतो. असं असताना केंद्र शासनाच्या पोषण अभियानाचा लाभ घेत हर्णव हा मुलगा कुपोषणातून बाहेर आला आहे.
पालघर जिल्ह्यातल्या बोईसर जवळील टेंभी इथं राहणारा लाभार्थी मुलगा हर्णव महेश भोये हा जेव्हा जन्माला आला होत तेव्हा त्याच वजन अतिशय कमी होत. 2024 मध्ये जेव्हा टेंभी अंगणवाडी केंद्राच्या सेविका अर्पिता यांना हे समजलं त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की बाळ कुपोषित आहे.
जन्माच्या चार महिन्यांमध्ये हे बाळ कुपोषित असल्याचं आढळून आलं. तेव्हापासून अंगणवाडी सेविका यांच्या कडून या बाळाच्या आईला वेळोवेळी पोषण आहाराविषयक माहिती देण्यात येऊ लागली. बाळाच्या आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा, त्याला दिवसातून कितीवेळा आणि कोणता आहार द्यावा, तो किती प्रमाणात द्यावा याविषयी माहिती दिली गेली. त्याचबरोबर बाळाला आणि त्याच्या आईला अंगणवाडी केंद्रांना मधून दिला जाणारा पोषण आहार दिला जाऊ लागला.
हे बाळ जेव्हा अंगणवाडी मध्ये येऊ लागलं त्यावेळी देखील त्याला केंद्रामधून शिजवून दिला जाणारा आहार दिला जाऊ लागला. आणि घरी देखील सेविकांनी सांगितल्या प्रमाणे बाळाची आई त्याला शिजवून पोषक आहार देऊ लागली. अंगणवाडीत वेळोवेळी त्याच वजन आणि उंची बघितली जात होती. आहारात होत आलेला बदल, वेळोवेळी घेतली जाणारी काळजी यामुळे आता हे कुपोषणाच्या जाळ्यातून मुक्त झालं आहे. आणि ते सुदृढ झालं आहे. त्याच वजन ही वाढलं आहे. आणि त्याचबरोबर त्याची उंची देखील वाढली आहे. पोषण आहाराच्या माध्यमातून आणि योग्य मार्गदर्शनामुळे बाळ कुपोषणातून बाहेर आल्यामुळे त्याच्या आईने आनंदाची भावना व्यक्त केली आहे.