पालघर : राज्य शासनाने ( State Government ) सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, एकाच कुटुंबातील सदस्यांच्या सामायिक जमिनीचे वाटणीपत्र ( Nominal Fee ) आता केवळ ५०० रुपयांत नोंदणीकृत करता येणार आहे. या निर्णयाची माहिती महसूल विभागाकडून ( Revenue Department ) देण्यात आली.
यापूर्वी एकाच कुटुंबातील विविध सदस्यांची सामायिक जमीन असल्यास, प्रत्येक सदस्याचे स्वतंत्र क्षेत्र निश्चित करून त्यास कायदेशीर मान्यता मिळवण्यासाठी तहसीलदारांकडून महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ ( Maharashtra Land Revenue Code, 1966 ) मधील कलम ८५ (२) अन्वये आदेश घेणे आवश्यक होते. तसचं परस्पर सामंजस्याने क्षेत्र विभागणी निश्चित करून नोंदणीकृत दस्त करण्यासाठी मोठा खर्च करावा लागत असल्याने नागरिकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता.
मात्र, महसूल मंत्र्यांच्या ( Revenue Minister ) नव्या निर्णयानुसार आता अशा वाटणीपत्राची नोंदणी केवळ ५०० रुपयांत करता येणार असल्याने ग्रामीण भागातील शेतकरी, जमीनधारक आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या सुविधेमुळे नागरिकांचा वेळ आणि पैसा दोन्हीची बचत होणार असून प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक होणार आहे. नागरिकांनी शासनाच्या या सुविधेचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा असं आवाहन पालघर जिल्हा प्रशासनाने केलं आहे.
















