पालघर : पालघर जिल्ह्यात ( Palghar district ) होत असलेल्या मुसळधार पावसामुळे ( Heavy rainfall ) पश्चिम किनारपट्टीवरील ( Western coast ) जनजीवन विस्कळीत झालं आहे. सततच्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याने ( Waterlogging ) प्रशासन सतर्क झालं असून बचावकार्य ( Rescue operations ) युद्धपातळीवर सुरू आहे. झांजरोळी ( Zhanjroli area ) परिसरात जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखड यांनी स्वतः घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
पहा व्हिडीओ …
मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका पालघरच्या पश्चिम किनारपट्टीला बसला आहे. झांजरोळी परिसरातील चार पाड्यांमधील 200 नागरिकांना प्रशासनाने सुरक्षित स्थळी हलवलं आहे. जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखड या NDRF पथकासह घटनास्थळी दाखल झाल्या असून बचाव आणि स्थलांतर मोहिमेवर स्वतः लक्ष ठेवत आहेत.
दरम्यान, मंडल पाडा ( Mandal Pada ) येथील 45 नागरिकांचेही यशस्वी रेस्क्यू ( Rescued ) करण्यात आलं असून त्यांनाही सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलं आहे. पालघरच्या पश्चिम भागात अद्याप ही मुसळधार पाऊस सुरू असून परिस्थितीवर प्रशासनाचे बारकाईने लक्ष आहे. नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, तसचं प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे असं आवाहन जिल्हा प्रशासनाने केलं आहे.

















