पालघर : पालघर जिल्ह्यातल्या अल्याळी चे तलाठी (46 वर्षे) महेशकुमार जनार्दन कचरे याला १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना सोमवारी दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पालघर यूनिटने रंगेहाथ अटक केली आहे.
तलाठी महेशकुमार जनार्दन कचरे यांनी तक्रारदाराने खरेदी केलेल्या जमिनीच्या फेरफारीची नोंद महसूल अभिलेखात करण्यासाठी तक्रारदाराकड़े 15,000 रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यानंतर याबाबत ची तक्रार तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकड़े केली. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे ठाणे परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक सुनिल लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पालघर यूनिटचे पोलीस उपअधीक्षक नवनाथ जगताप, पोलीस निरीक्षक स्वपन बिश्वास आणि त्यांच्या टीम मधील पोहवा/विलास भोये, योगेश धारणे, संजय सुतार, निशा मांजरेकर, नवनाथ भगत, दिपक सुमडा यांनी सोमवारी सापळा रचून दुपारच्या सुमारास पालघर मधल्या शुक्ला कंपाउंड मध्ये १० हजारांची लाच घेताना तलाठी महेशकुमार कचरे याला रंगेहाथ अटक केली. आपण पकडले गेल्याचं तलाठी कचरेच्या लक्षात आल्यानंतर त्यानं तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र एसीबी च्या पथकाने त्याचा पाठलाग करून त्याला पकडले. या प्रकरणी पालघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल त्यांच्या विरुद्ध दाखल करण्यात आला आहे.