दिनांक ३० ऑक्टोंबर २०२० (बाबासाहेब गुंजाळ) भारतीय ॲथलेटिक्स महासंघाच्या अध्यक्षपदी आदिल सुमारीवाला(महाराष्ट्र) यांची तिसऱ्यांदा बिनविरोध निवड झाली आहे . तर रवींद्र चौधरी (उत्तरांचल) यांची सचिवपदी , झारखंडचे मधुकांत पाठक यांची खजिनदारपदी आणि अंजू बॉबी जॉर्ज यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे.
ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया यांची राष्ट्रीय कार्यकारिणीची निवड नुकत्याच झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बिनविरोध करण्यात आली. महाराष्ट्र ॲथलेटिक्स असोसिएशन अध्यक्ष आदिलजी सुमारीवाला यांची अध्यक्ष म्हणून सर्वांनी बिनविरोध निवड केली. आदिल जी हे माजी ओलंपियन असून यांच्या अध्यक्षतेखाली या खेळाचे भारतात चांगली प्रसार आणि प्रचार झालेला असून प्रगती चांगली असल्यामुळे आदिल सुमारे वाला यांना भारतभरातून सर्व राज्याकडून पाठिंबा मिळत असतो.
जेव्हा खेळाडू त्या खेळाच्या राष्ट्रीय संघटनेचा अध्यक्ष असतो त्यावेळेस तो खेळाला पुढे घेऊन जाण्यासाठी आपलं सर्वस्व झोकून देत काम करत त्या खेळाला सुवर्णयुग प्राप्त करून देण्यासाठी धडपड करत असतो याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे मैदानी खेळ अथलेटिक्स या खेळात भारताला आता ऑलिम्पिकमध्येही पदक मिळवून देणारे दावेदार तयार झाले आहेत. आशियाई स्पर्धा राष्ट्रकुल स्पर्धा यासारख्या स्पर्धांमध्ये भारत खेळात पदकांची लयलूट करत असतो याचे श्रेय आदिल सुमारीवाला यांना जातं. त्यांच्या यापूर्वीच्या अध्यक्षतेखाली घेतलेल्या निर्णयांचा परिणाम आता खूप चांगल्या प्रमाणात समोर आला आहे.
राष्ट्रीय कार्यकारिणी :
अध्यक्ष : आदिल सुमारीवाला (महाराष्ट्र), उपाध्यक्ष : अंजू बॉबी जॉर्ज, सचिव :रवींद्र चौधरी (उत्तरांचल), खजिनदार : मधूकांत पाठक (झारखंड)
भारतीय ॲथलेटिक्स असोसिएशन ची निवडणूक वर्ल्ड ॲथलेटिक्स असोसिएशनचे प्रतिनिधी जनरल विक्रम साही आशियाई ॲथलेटिक्स असोसिएशन चे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. धनराज चौधरी हे भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे प्रतिनिधी म्हणून यावेळी हजर होते. विजयालक्ष्मी गुप्ता यांच्या देखरेखीत ही निवडणूक पार पडली.