पालघर : आदिम जमातीचं संरक्षण आणि विकास कार्यक्रमा अंतर्गत जव्हार, मोखाडा, विक्रमगड आणि वाडा या चार तालुक्यातल्या आदिम जमातीच्या (कातकरी) भाजीपाला उत्पादक गटांमार्फत संकलित केलेला भाजीपाला प्रत्यक्ष ग्राहकांपर्यंत पुरवठा करुन उत्पन्न वृध्दी ,रोजगारनिर्मिती आणि विपणन व्यवस्थेचं बळकटीकरण व्हावं या उद्देशानं आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत Providing Assistance For Vegetable sell Mobile Van and Temporery Shelter. ( भाजीपाला विक्रीसाठी वाहन उपलब्ध करुन देणे) हि योजना मंजूर करण्यात आलेली आहे. या योजनेसाठी 02 गट लक्षांक आहे.
लाभार्थी आवश्यक कागदपत्रांसह एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प जव्हार या कार्यालयात 12 नोव्हेंबर पर्यंत आपापले अर्ज जमा करू शकतात.